Look Back 2020: टॉप 10 इंडियन वेब सीरिज, तुम्ही पाहिल्यात का?

scam.
scam.

2020 वर्ष संपत आलं आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे मार्चनंतर सिनमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या काळात लोकांनी घरात बसून ऑनलाईन वेब सीरिजजा आनंद घेतला. यावर्षीच्या टॉप 10 हिंदी वेब सीरिज आपण बघुया...

स्कॅम 1992 

स्कॅम 1992 ला 2020 मधील सर्वात सुपरहिट वेब सीरिज मानले जाते. याची स्टोरी 90 व्या दशकातील हर्षद मेहता याने शेअर बाजारात केलेल्या घोटाळ्यावर आधारित आहे. यात प्रतिक गांधीने मुख्य भूमिका साकारली आहे. 

स्पेशल ऑप्स

नीरज पांडे यांच्या 'स्पेशल ऑप्स'लाही लोकांची पसंती मिळाली. सीरिजमध्ये केके मेनन मुख्य भूमिकेत होते. त्यांनी रॉ अधिकाऱ्याची भूमिका केली असून, आपल्या एजेंट्स मार्फत ते परदेशात दहशतवाद्यांचा खात्मा करतात. 

पहिल्या मिर्जापुरमधील धमाकेदार अॅक्शननंतर सीजन 2 ची अनेकांना प्रतिक्षा होती. मिर्जापुर- सीजन 2 नेही चांगला धुमाकूळ घातला. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आणि  ईशा तलवार यांच्या भूमिका पसंद करण्यात आल्या. 

आश्रम

प्रकाश झा यांनी बनवलेल्या आश्रमचे 2020 मध्ये दोन सीजन प्रदर्शित झाले. पहिला सीजन ऑगस्ट आणि दुसरा सीजन नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाला. यात बॉबी देओल, चंदन रॉय सान्याल, अदिति पोहनकर, तुषार पांडे, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयनका, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर आणि अध्ययन सुमन या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली. 

आर्या

आर्याच्या माध्यमातून अभिनेत्री सुष्मिता सेनने धमाकेदार कमबॅक केला. या थ्रिलर वेब सीरिजमध्ये सुष्मिताने मुख्य भूमिका निभावली आहे.

पाताल लोक

2020 च्या  पॉप्युलर सीरिजमध्ये पाताळ लोकचे नाव नक्की येते. या क्राईम ड्रामा सीरिजमध्ये  जयदीप अहलावत, गुल पनाग, बोधिसत्व शर्मा, इशवाक सिंह, नीरज काबी, स्वास्तिका मुखर्जी आणि अमिषेक बनर्जी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 

पंचायत

पंचायत वेब सीरिजही चांगलीच पंसतीस उतरली. या कॉमिडी-ड्रामा सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, विस्वपति सरकार यांनी मुख्य भूमिका निभावली आहे.

क्राइम-थ्रिलर सीरीज 'असुर'ला अनेकांनी पसंद केलं. अरशद वारसीने यात मुख्य भूमिका केली आहे.

बंदिश बँडिट्स

रोमँटिक-ड्रामा सीरिज 'बंदिश बँडिट्स'मध्ये रित्विक भौमिक, श्रेया चौधरी, नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, शीबा चड्डा, राजेश तैलंग कुणाल रॉय कपूर आणि त्रिधा चौधरी यांनी भूमिका साकारली आहे. यातील गाण्यांनी लोकांची वाहवाह मिळवली.

अ सिंपल मर्डर

'अ सिंपल मर्डर' क्राइम-ऐक्शन-कॉमिडी सीरिज आहे. या सीरिजमध्ये मोहम्मद जीशान अयूब, सुशांत सिंह, अमित सियाल, प्रिया आनंद, विजय राज, विक्रम कोचर, यशपाल शर्मा यांनी मुख्य भूमिका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com